विवाहितेला धमकी ः ७५ हजार रुपये दे नाहीतर तुझे माझ्याकडील फोटो नवऱ्याला दाखवतो…; शेगाव शहरातील घटना

शेगाव : ७५ हजार रुपये दे नाहीतर तुझे फोटो व्हायरल करतो व तुझ्या नवऱ्याला दाखवतो, अशी धमकी दिल्याची तक्रार ३३ वर्षीय विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात काल, १० ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. धनगर फैल, शेगाव येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय विवाहितेला काल सायंकाळी ५ वाजता प्रवीण रमेश कांबळे (रा. शेगाव) …
 
विवाहितेला धमकी ः ७५ हजार रुपये दे नाहीतर तुझे माझ्याकडील फोटो नवऱ्याला दाखवतो…; शेगाव शहरातील घटना

शेगाव : ७५ हजार रुपये दे नाहीतर तुझे फोटो व्हायरल करतो व तुझ्या नवऱ्याला दाखवतो, अशी धमकी दिल्याची तक्रार ३३ वर्षीय विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात काल, १० ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

धनगर फैल, शेगाव येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय विवाहितेला काल सायंकाळी ५ वाजता प्रवीण रमेश कांबळे (रा. शेगाव) याने फोन केला. ७५ हजार रुपये दे नाहीतर तुझे माझ्याजवळ असलेले फोटो व्हायरल करेन व तुझ्या पतीला दाखवेन, अशी धमकी विवाहितेला दिली. मी पैसे देऊ शकत नाही असे विवाहिता म्हणाली असता पैसे द्यायचे नसेल तर माझ्याकडे येऊन शारीरिक संबंध ठेव, अशी धमकी प्रवीण याने दिली. तक्रारीवरून पोलिसांनी प्रवीण कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.