विधवा आई-बहीण, गतिमंद भावाचा आधार नियतीने हिरावला… युवकाला मळणी यंत्रात मृत्‍यूने ओढले! मेहकर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हरभरा काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना मेहकर तालुक्यातील सोनाटी येथे आज, 25 फेब्रुवारीच्या दुपारी 12:30 च्या सुमारास घडली. समाधान गिरी (22) असे या युवकाचे नाव आहे. समाधान हा गावातीलच दत्ता पाटील बदर यांच्या मालकीच्या मळणी यंत्रावर कामाला गेला होता. दुपारी नंदकिशोर बदर यांच्या सोनाटी शिवारातील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हरभरा काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना मेहकर तालुक्यातील सोनाटी येथे आज, 25 फेब्रुवारीच्‍या दुपारी 12:30 च्या सुमारास घडली.

समाधान गिरी (22) असे या युवकाचे नाव आहे. समाधान हा गावातीलच दत्ता पाटील बदर यांच्या मालकीच्या मळणी यंत्रावर कामाला गेला होता. दुपारी नंदकिशोर बदर यांच्या सोनाटी शिवारातील शेतात हरभरा काढणे चालू असताना मळणी यंत्राच्या टपात गेल्‍याने त्याचा जागीच मृत्यू झाला. समाधान गिरी यांच्या वडिलांचे निधन झालेले आहे. तो कुटुंबाचा आधार होता. आई, एक गतिमंद भाऊ आणि एक विधवा बहीण या संपूर्ण परिवाराचा तोच कर्ताधर्ता होता.