वाढदिवसाच्या दिवशीच लोणारच्या डॉक्टरांवर काळाचा घाला; मॉर्निंग वॉकला गेले असताना वाहनाने उडवले

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉक्टरांना रस्त्याच्या बाजूला व्यायाम करत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज, १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास लोणार- लोणी रोडवरील पाणस शिवारातील पुलाजवळ घडली. डॉ. सुरेश फकिरराव सानप (४७, रा. सहकारनगर, लोणार) …
 
वाढदिवसाच्या दिवशीच लोणारच्या डॉक्टरांवर काळाचा घाला; मॉर्निंग वॉकला गेले असताना वाहनाने उडवले

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉक्टरांना रस्‍त्‍याच्‍या बाजूला व्यायाम करत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्‍यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज, १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास लोणार- लोणी रोडवरील पाणस शिवारातील पुलाजवळ घडली.

डॉ. सुरेश फकिरराव सानप (४७, रा. सहकारनगर, लोणार) असे अपघातात ठार झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. ते मूळचे पिंपळनेरचे हाेते. विशेष म्हणजे आजच त्यांचा वाढदिवस होता. डॉ. सानप यांचा मंठा (जि. जालना) येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी लोणी रोडवर गेले होते. सकाळी साडेपाचला त्‍यांना वाहनाने धडक दिली. यात त्‍यांच्‍या डोक्‍याला जबर मार लागला. लोणार येथेच प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जालना येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या प्रकरणी त्‍यांचे चुलत भाऊ संजय देवराव सानप (रा. पिंपळनेर) यांच्‍या तक्रारीवरून अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.