लॉकडाऊनमुळे गावी आला होता, २१ वर्षीय तरुणाचा शेतात गळफास!; चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, २२ जूनला असोला (ता. चिखली) सकाळी समोर आली. मंगल सदाशिव चव्हाण असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गावालगत असलेल्या तलावाजवळील निंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतला. सकाळी गावातील काही लोकांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तो औरंगाबाद येथे एका कंपनीत नोकरी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, २२ जूनला असोला (ता. चिखली) सकाळी समोर आली. मंगल सदाशिव चव्हाण असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गावालगत असलेल्या तलावाजवळील निंबाच्या झाडाला त्‍याने गळफास घेतला. सकाळी गावातील काही लोकांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तो औरंगाबाद येथे एका कंपनीत नोकरी करत होता. मात्र लॉकडाऊन असल्याने गेल्या २ महिन्यांपासून गावाकडे आला होता. मंगलच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.