लिफ्ट देणाऱ्यालाच लुटले; सिड्स कंपनीच्या एरिया मॅनेजरवर बाका प्रसंग!; सिंदखेड राजा तालुक्यात खळबळ

किनगावराजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्यात मोटारसायकल अडवून लिफ्ट मागितली. निर्जनस्थळी गेल्यावर लिफ्ट देणाऱ्या सिड्स कंपनीच्या एरिया मॅनेजरला लुटले. त्याची मोटारसायकलही नेली. ही खळबळजनक घटना काल, 28 जूनला सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी ते पिंपरखेड रस्त्यावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. पराग विलास मुरकुटे (28, रा. मुंगळा, ता. मालेगाव जि वाशिम) हे एका सिड्स …
 

किनगावराजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रस्त्यात मोटारसायकल अडवून लिफ्ट मागितली. निर्जनस्थळी गेल्यावर लिफ्ट देणाऱ्या सिड्स कंपनीच्या एरिया मॅनेजरला लुटले. त्‍याची मोटारसायकलही नेली. ही खळबळजनक घटना काल, 28 जूनला सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी ते पिंपरखेड रस्त्यावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

पराग विलास मुरकुटे (28, रा. मुंगळा, ता. मालेगाव जि वाशिम) हे एका सिड्स कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून काम करतात. सध्या देऊळगाव राजा येथे राहतात. काल कंपनीच्या कामानिमित्त वर्दडी (ता. सिंदखेड राजा) येथे जात होते. त्यावेळी सोनोशी गावाजवळील पानटपरी जवळ ते थांबले असता तिथे दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची विचारपूस केली. कुठे राहता? काय करता? कुठे जाताय ?असे प्रश्न विचारले. त्यानंतर त्यातील एकाने मलाही वर्दडीला जायचंय तुमच्या गाडीवर येऊ द्या, अशी विनंती केली. मुरकुटे यांनी अनोळखी व्यक्तीला गादीवर बसवले व वर्दडीकडे निघाले. काही अंतरावर गेल्यावर रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने गाडी थांबवली. त्याचवेळी मागे बसलेल्या व्यक्तीचा एक मित्र तिथे मोटारसायकलने आला व मी पण वर्दडीला जातोय आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ, असे म्हणत माझ्या मागे गाडी आणा, असे सांगितले.

मुरकुटे यांनी गाडी त्या अनोळखी व्यक्तीच्या मागे नेली. तेव्हा सोनोशी ते पिंपरखेडच्या दरम्यान मुरकुटे याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने तुझ्या जवळ काय काय आहे ते मुकाट्याने काढ, असे म्हटले. नाल्याजवळ गाडी थांबवली व दोघांनी मिळून खिशातील नगदी 250 रुपये, आधारकार्ड एटीएम कार्ड, इतर कागदपत्रे, हातातील मनगटी घड्याळ किंमत 2500 रुपये व पाठीवरील बॅग हिसकावून घेतली. मुरकुटे यांच्या गाडीची चाबी हिसकावून शाईन कंपनीची (क्र.एमएच 28 बीडी 0250, अंदाजे किंमत 35000 रुपये) मोटारसायकल घेऊन पसार झाले. घाबरून गेलेल्या मुरकुटे यांनी स्थानिक नागरिकांची मदत घेत किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठले व प्रकरणाची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी 2 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लुटारूंविराेधात कडक कारवाईसाठी ॲग्रीकल्चर असोसिएशनने ठाणेदारांना निवेदन दिले.