लाल -तांबड्या गेला चोरीला… शेतकऱ्याची तक्रार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव महीजवळील (ता. देऊळगाव राजा) दिग्रस रोडवरील शेतातील गोठ्यातून बैलजोडी चोरीस गेली आहे. शेतकऱ्याने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. शेतकरी दत्तात्रय एकनाथ शिंगणे यांचा दिग्रस रोडवर गोठा आहे. या गोठ्यात त्यांची बैलजोडी बांधलेली होती. 8 मार्चच्या रात्री चोरट्याने बैलजोडी चोरून नेली. 9 मार्चला पहाटे शिंगणे यांच्या ही बाब लक्षात आली. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव महीजवळील (ता. देऊळगाव राजा) दिग्रस रोडवरील शेतातील गोठ्यातून बैलजोडी चोरीस गेली आहे. शेतकऱ्याने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

शेतकरी दत्तात्रय एकनाथ शिंगणे यांचा दिग्रस रोडवर गोठा आहे. या गोठ्यात त्यांची बैलजोडी बांधलेली होती. 8 मार्चच्‍या रात्री चोरट्याने बैलजोडी चोरून नेली. 9 मार्चला पहाटे शिंगणे यांच्‍या ही बाब लक्षात आली. त्‍यांनी काल आणि आज बराच शोध घेऊनही बैल सापडले नाहीत. अखेर त्‍यांनी आज देऊळगावमही पोलीस चौकीत बैल चोरीची तक्रार दिली आहे.