लग्‍न माझ्या मनाप्रमाणे केले नाही…. विवाहितेचा मांडला छळ!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्न माझ्या मनाप्रमाणे केले नाही, हुंडा कमी दिला, तू मला पसंत नाही… असे म्हणून विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पती, सासू-सासऱ्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सौ. सरिता प्रवीण साखला (26, रा. जुना धान्य बाजार, खामगाव) या विवाहितेने तक्रार केली आहे. पती प्रवीण पृथ्वीराज साखला, सासरा पृथ्वीराज …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लग्‍न माझ्या मनाप्रमाणे केले नाही, हुंडा कमी दिला, तू मला पसंत नाही… असे म्‍हणून विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पती, सासू-सासऱ्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. सरिता प्रवीण साखला (26, रा. जुना धान्य बाजार, खामगाव) या विवाहितेने तक्रार केली आहे. पती प्रवीण पृथ्वीराज साखला, सासरा पृथ्वीराज साखला व सासू (सर्व रा. जुना धान्य बाजार खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. प्रवीण व त्‍याच्‍या आई-वडिलांनी सरिताला टोमणे मारून तिचा शारीरिक व मानसिक खेळ केला. दुकानाचे कर्ज फेडायचे आहे तुझ्या माहेरकडून 1 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली. त्‍यासाठी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास ना.पो. काँ. फासे करत आहेत.