रानडुकराच्या हल्ल्यात एक जण गंभीर; लोणार सरोवर परिसरातील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाहेर शौचास गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीवर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना काल, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता लोणार सरोवर परिसरात घडली. रामचंद्र अर्जुन पवार (रा. लोणार) हे काल सकाळी शौचासाठी बाहेर जात होते. त्यावेळी रानडुकराने मागून येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. आरडाओरड …
 
रानडुकराच्या हल्ल्यात एक जण गंभीर; लोणार सरोवर परिसरातील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाहेर शौचास गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीवर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना काल, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता लोणार सरोवर परिसरात घडली.

रामचंद्र अर्जुन पवार (रा. लोणार) हे काल सकाळी शौचासाठी बाहेर जात होते. त्यावेळी रानडुकराने मागून येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. आरडाओरड केल्याने रानडुक्कर पळून केले. जखमींवर लोणार ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य असल्याने या परिसरात बिबट, तडस, रानडुक्कर, लांडगे या प्राण्यांचा वावर असतो. या परिसरात शेळ्या आणि जनावरांवर हल्ले झाल्याचा घटना यापूर्वी घडल्या आहेत.