रात्री 9.30 ला घरातून गेलेली 25 वर्षीय विवाहिता सापडेना!; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 25 वर्षीय विवाहिता कुणाला काहीही न सांगता निघून गेल्याची घटना खामगावच्या चांदमारी भागात समोर आली आहे. पूजा गजानन लांडगे (25, रा. चांदमारी, खामगाव) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. ती 7 मार्चला रात्री 9:30 वाजता घरून निघून गेली. घरच्यांनी रात्री आणि 8 मार्च रोजी दिवसभर नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेतला मात्र …
 

खामगाव  (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 25 वर्षीय विवाहिता कुणाला काहीही न सांगता निघून गेल्याची घटना खामगावच्‍या चांदमारी भागात समोर आली आहे. पूजा गजानन लांडगे (25, रा. चांदमारी, खामगाव) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. ती 7 मार्चला रात्री 9:30 वाजता घरून निघून गेली. घरच्यांनी रात्री आणि 8 मार्च रोजी दिवसभर नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने काल रात्री उशिरा याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.