रात्री ११ ला झोपेतून बाथरूमसाठी उठली, परतली तर पतीने घेतला संशय!; पिंपळगाव राजा येथील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाथरूमसाठी रात्री झोपेतून उठलेली पत्नी परतल्यानंतर विनाकारण संशय घेऊन तिला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी आज, १३ ऑक्टोबरला सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथील शंकरनगरात काल, १२ ऑक्टोबरच्या रात्री ११ च्या सुमारास घडली. सौ. समिना प्रविण जुबेर खान (१९) हिने या प्रकरणात तक्रार …
 
रात्री ११ ला झोपेतून बाथरूमसाठी उठली, परतली तर पतीने घेतला संशय!; पिंपळगाव राजा येथील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाथरूमसाठी रात्री झोपेतून उठलेली पत्‍नी परतल्यानंतर विनाकारण संशय घेऊन तिला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी आज, १३ ऑक्‍टोबरला सकाळी गुन्‍हा दाखल करण्यात आला. ही घटना पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथील शंकरनगरात काल, १२ ऑक्‍टोबरच्‍या रात्री ११ च्‍या सुमारास घडली.

सौ. समिना प्रविण जुबेर खान (१९) हिने या प्रकरणात तक्रार दिली. जुबेर खान लुकमान खान (२४, रा. शंकरनगर पिंपळगाव राजा) असे मारहाण करणाऱ्या पतीचे नाव आहे. काल रात्री अकराच्‍या सुमारास समिना बाथरूमला न जाता बाहेर कुठेतरी गेली होती, असा विनाकारण संशय घेऊन जुबेरने तिला लोखंडी पलंगावर लोटले. त्यामुळे तिच्‍या डोक्याला लोखंडी पलंग लागून ती जखमी झाली. तपास एएसआय प्रवीणसिंह चौहान करत आहेत.