रस्त्याने बोलत चालणाऱ्याचा पळवला होता मोबाइल; पोलिसांनी चौघांना पकडले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्याने बोलत निघालेल्या व्यक्तीचा मोबाइल हिसकावून धूमस्टाईल पळ काढणाऱ्या 4 मुलांना बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने 3 मार्च रोजी पकडले. चारही मुले अल्पवयीन आहेत. त्यांना आज बालन्यायमंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.29 जानेवारी 2020 रोजी बुलडाण्यातील केशवनगरातून अनिल मधुकर साळवे रात्री साडेनऊ वाजता मोबाइलवर बोलत रस्त्याने जात होते. त्याचवेळेस भरधाव दुचाकीवरून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रस्त्याने बोलत निघालेल्या व्यक्तीचा मोबाइल हिसकावून धूमस्टाईल पळ काढणाऱ्या 4 मुलांना बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने 3 मार्च रोजी पकडले. चारही मुले अल्‍पवयीन आहेत. त्यांना आज बालन्यायमंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.
29 जानेवारी 2020 रोजी बुलडाण्यातील केशवनगरातून अनिल मधुकर साळवे रात्री साडेनऊ वाजता मोबाइलवर बोलत रस्त्याने जात होते. त्याचवेळेस भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. या घटनेची तक्रार देण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष पथक नेमले. उपविभागातील आठही पोलीस ठाण्यांचे काही निवडक कर्मचारी आणि पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे आणि पीएसआय सुधाकर गवारगुरू यांच्यावर या पथकाची जबाबदारी आहे. पथकाने तांत्रिक तपास करत आरोपींना शोधून काढले. एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून अन्य तिघांची नावे समोर आली. शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चारही जण 16 ते 17 वयोगटातील आहेत. आज त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. त्‍यांच्या चौकशीतून आणि काही गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे.