येळगाव धरणात पोहायला गेलेला तरुण धरणाच्या गेटमध्ये फसला; जागीच मृत्यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येळगाव धरणात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गेटमध्ये फसल्याने मृत्यू झाला. ही घटना आज, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येळगाव धरणावरील गोडबोले गेटजवळ घडली. आकाश सुखदेव धुरंदर (३०, रा. भीमनगर, वॉर्ड २, बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश त्याच्या तीन मित्रांसोबत येळगाव धरणावर पोहण्यासाठी गेला होता. गेटवरून त्याने …
 
येळगाव धरणात पोहायला गेलेला तरुण धरणाच्या गेटमध्ये फसला; जागीच मृत्यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येळगाव धरणात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गेटमध्ये फसल्याने मृत्यू झाला. ही घटना आज, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येळगाव धरणावरील गोडबोले गेटजवळ घडली. आकाश सुखदेव धुरंदर (३०, रा. भीमनगर, वॉर्ड २, बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आकाश त्याच्या तीन मित्रांसोबत येळगाव धरणावर पोहण्यासाठी गेला होता. गेटवरून त्याने धरणात उडी मारली. मात्र पाण्याच्या प्रवाहाने वाहत आल्याने तो गेटमध्ये फसला. त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. आकाशच्या मृत्यूची बातमी कळताच जिल्हा रुग्णालयात त्याच्या नातेवाइक, मित्रांनी गर्दी केली. आकाश बजाज फायनान्समध्ये काम करत होता. त्याच्या पश्चात आई- वडील, दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.