मुलीवाले पसंत करून गेले, मेमध्ये लग्‍नही ठरले… अन्‌ त्‍याने त्‍याच रात्री घेतला गळफास!; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुढच्या महिन्यात विवाह ठरलेल्या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वडी (ता. नांदुरा) शिवारातील धामोडकर यांच्या शेतात काल, 26 एप्रिलच्या सकाळी समोर आली. नीलेश गोविंदा इंगळे (31, रा. ध्रृव चौक, नांदुरा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीलेशचा विवाह मे महिन्यात होणार होता. मुलीकडील मंडळी त्याला पाहून …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पुढच्‍या महिन्यात विवाह ठरलेल्या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना वडी (ता. नांदुरा) शिवारातील धामोडकर यांच्‍या शेतात काल, 26 एप्रिलच्‍या सकाळी समोर आली.

नीलेश गोविंदा इंगळे (31, रा. ध्रृव चौक, नांदुरा) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, नीलेशचा विवाह मे महिन्यात होणार होता. मुलीकडील मंडळी त्‍याला पाहून गेली होती. लग्‍नही पक्‍के झाले होते. पाहुणे त्‍यांच्‍या गावी निघून गेल्यावर 25 एप्रिलला सायंकाळी तो शेतात बैलांना चारापाणी करण्यासाठी निघून गेला. मात्र तो रात्र झाली तरी परतला नाही. शेतात जाऊन त्‍याचा शोध घेण्यात आला. पण तो मिळून आला नाही. मोबाइलही तो उचलत नव्‍हता. अखेर तो हरवल्याची तक्रार देण्यात आली. काल सकाळी धामोडकर यांच्‍या शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्‍थेत तो मिळून आला. नीलेशचे काका मुकुंदा रामभाऊ इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. तपास एएसआय चंद्रकांत मोरे करत आहेत.