मित्रांना “निरोप’ द्यायला आले…काळाने घातला घाला!; बोथा घाटात अपघात, दुचाकीस्वार बँक कर्मचारी ठार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल, ११ जुलैला रात्री आठच्या सुमारास बोथा घाटातील सरपंच ढाब्याजवळ घडली. संदीप पंजाबराव देशमुख (४०, रा. देऊळघाट, हल्ली मुक्काम अकोला) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संदीप देशमुख हे अकोला येथे सेंट्रल बँकेत कॅशिअर होते. बुलडाणा येथे बँकेतील काही सहकाऱ्यांना …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल, ११ जुलैला रात्री आठच्‍या सुमारास बोथा घाटातील सरपंच ढाब्याजवळ घडली. संदीप पंजाबराव देशमुख (४०, रा. देऊळघाट, हल्ली मुक्काम अकोला) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

संदीप देशमुख हे अकोला येथे सेंट्रल बँकेत कॅशिअर होते. बुलडाणा येथे बँकेतील काही सहकाऱ्यांना निरोप समारंभाची पार्टी देण्यासाठी ते आले होते. काल अकोला येथे दुचाकीने परत जाताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. अपघातानंतर मृतदेह बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. संदीप देशमुख यांना पत्नी, आठ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी असा परिवार आहे.