माहेरी राहणारी विवाहिता गायब!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मडाखेड बुद्रूक (ता. जळगाव जामोद) येथे माहेरी आलेली महिला गायब झाली आहे. १५ जुलैच्या दुपारी दीडपासून ती बेपत्ता असून, तिचा आजवर तपास लागलेला नाही. मंगेश सुरेश गायगोळ (रा मडाखेड बुद्रूक) हे विवाहितेचे भाऊ असून, त्यांनी या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांची बहीण सौ. …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मडाखेड बुद्रूक (ता. जळगाव जामोद) येथे माहेरी आलेली महिला गायब झाली आहे. १५ जुलैच्‍या दुपारी दीडपासून ती बेपत्ता असून, तिचा आजवर तपास लागलेला नाही.

मंगेश सुरेश गायगोळ (रा मडाखेड बुद्रूक) हे विवाहितेचे भाऊ असून, त्‍यांनी या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यांची बहीण सौ. वनिता पुरुषोत्तम सित्रे (३५, रा. घाणेगाव ता. खामगाव) या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेल्या आहेत. उंची ५.३ इंच, रंग गोरा, अंगावर पिवळी साडी आहे. त्‍या सहा-सात महिन्यांपासून माहेरी राहत होत्या. डॉ. केळकर अकोला यांच्याकडे त्‍यांच्यावर उपचार सुरू होते. त्‍या कुठेही मिळून आल्यास जळगाव जामोद पोलीस ठाणे किंवा पुरुषोत्तम सित्रे (मो नं. 9579953074), मंगेश सुरेश गायगोळ (मो. नं. 9370797021) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.