महिलेचे अपहरण ः पाचही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यातील महिलेचे अपहरण करून तिचे मध्यप्रदेशात लग्न लावल्या प्रकरणात पाचही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज, 13 फेब्रुवारीला दुपारी याप्रकरणातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.बुलडाणा शहरातील एका 36 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिचे जबरदस्ती लग्न लावण्यात आले होते. काल पहाटेच बुलडाणा शहर पोलिसांनी मध्यप्रदेशात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यातील महिलेचे अपहरण करून तिचे मध्यप्रदेशात लग्न लावल्या प्रकरणात पाचही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज, 13 फेब्रुवारीला दुपारी याप्रकरणातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
बुलडाणा शहरातील एका 36 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिचे जबरदस्ती लग्न लावण्यात आले होते. काल पहाटेच बुलडाणा शहर पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन त्या महिलेची सुटका करत तिच्या कथित पतीलाही ताब्यात घेतले होते. याप्रकरणात आणखी काही सूत्रधार हाती लागण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये मध्यप्रदेशातील एक पुरुष, येळगाव (ता. बुलडाणा) येथील एका पुरुषासह बुलडाण्यातील तीन महिलांचा समावेश आहे.