मलकापूरच्या समधा मेन्स वेअर, माहेश्वरी कलेक्शनच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवांनाच, तेही सकाळी 7 ते 11 अशी वेळ दिली आहे. असे असताना मलकापूरमध्ये बुलडाणा रोडवरील समधा मेन्स वेअर आणि माहेश्वरी कलेक्शन ही दोन कापड दुकाने सुरू होती. या दोन्ही दुकानांच्या मालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवांनाच, तेही सकाळी 7 ते 11 अशी वेळ दिली आहे. असे असताना मलकापूरमध्ये बुलडाणा रोडवरील समधा मेन्स वेअर आणि माहेश्वरी कलेक्शन ही दोन कापड दुकाने सुरू होती. या दोन्ही दुकानांच्या मालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक श्री. ठाकरे, पोकाँ. संजय पठार, पोकाँ सलीम बर्डे, पोकाँ अनिल डागोर पेट्रोलिंग करत असताना त्यांना या दुकानांत ग्राहकी सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे दोन्ही दुकानांचे मालक असलेल्या रोशन सुरेश भट्टर (39, रा. प्रशांतनगर  मलकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.