मर्डर..! मोताळा तालुक्यातील लालमाती फाट्यावर खून;आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन म्हणाला...
Updated: Mar 13, 2025, 08:35 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील लालमाती फाट्यावर काल,१२ मार्चच्या सायंकाळी रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. जुन्या वादातून एकाने दुसऱ्याची डोक्यात टॉमी घालून हत्या केली..विशेष म्हणजे या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला खरा..मात्र तो थेट पोलिस ठाण्यात पोहोचला..आणि खून केल्याची कबुली दिली..! अनिल प्रल्हाद बावस्कर(४७, रा. पान्हेरा, ता. मोताळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे..

AdvtAdvAdvtAdv
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना लाल माती फाट्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर घडली. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. मृतक अनिल बावस्कर आणि
पान्हेरा येथीलच प्रदीप कुळे यांच्यात जुने वाद होते. या वादातून लाल माती फाटा येथील इंडियन ऑइल पंपासमोर प्रदीप कुळे याने अनिल बावस्कर यांच्या डोक्यात लोखंडी टोमणे बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनिल बावस्कर यांचा मृत्यू झाला. फोन केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला मात्र तो थेट धामणगाव बढे पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथे त्याने खून केल्याची कबुली दिली. घटनास्थळी धामणगाव पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली..