मद्यधुंद आयशरचालकाने आधी दुधाचे वाहन, नंतर कारला उडवले!; सुदैवाने जिवीतहानी नाही!!; देऊळगाव राजा तालुक्‍यातील थरार

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मद्यधुंद आयशर चालकाने दुधाच्या वाहनास धडक दिल्यानंतर पळून जाण्याच्या नादात ओमनी कारला उडवले. यात एक जण जखमी झाला आहे. ही घटना जालना ते चिखली रोडवरील असोला फाट्याजवळ (ता. देऊळगाव राजा) आज, 1 जुलैला दुपारी 1 च्या सुमारास घडली. आयशर (क्र. एमपी 09 जीजी 6771) जालन्याकडून येत …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मद्यधुंद आयशर चालकाने दुधाच्‍या वाहनास धडक दिल्यानंतर पळून जाण्याच्‍या नादात ओमनी कारला उडवले. यात एक जण जखमी झाला आहे. ही घटना जालना ते चिखली रोडवरील असोला फाट्याजवळ (ता. देऊळगाव राजा) आज, 1 जुलैला दुपारी 1 च्‍या सुमारास घडली.

आयशर (क्र. एमपी 09 जीजी 6771) जालन्‍याकडून येत होता. त्‍याचा चालक संतोष कुमार (रा. मध्यप्रदेश) मद्यधुंद अवस्‍थेत वाहन चालवत असताना त्‍याने दुपारी एकच्या सुमारास चिखलीकडून देऊळगाव राजाकडे येणाऱ्या (एमएच 28 बीबी 2163) दुधाच्‍या वाहनाला धडक दिली. मात्र चालक दत्ता कुंडलिक हांडे (35) यांनी वाहनावर नियंत्रण मिळवले. त्‍यामुळे वाहनाचे मोठे नुकसान टळले. मात्र या अपघातानंतर घाबरून पळून जाताना आयशर चालकाने जालन्यावरून बुलडाण्याकडे जात असलेल्‍या अनिलकुमार बेनीसिंग भारद्‌वाज (45) यांच्‍या कारला धडक दिली. यात कारमधील भारद्‌वाज यांच्‍या नातेवाइकाच्‍या कमरेला झटका बसल्यामुळे त्‍यांना जालना येथे हलविण्यात आले.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेतील राहुल दांडगे, शीतल नांदवे तात्‍काळ घटनास्थळी दाखल झाले. दत्ता हांडे व अनिल कुमार भारद्‌वाज यांच्या तक्रारीवरून आयशरचालक संतोष कुमार याच्याविरुद्ध देउळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.