मंगरूळ शिवारात जुगार अड्ड्यावर छापा, ९ अटकेत, दोन लाखांचा मुद्देमाल जप्‍त

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मंगरूळ (ता. चिखली) शिवारात जुगार अड्ड्यावर छापा मारून अंढेरा पोलिसांनी ९ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून २ लाख ८ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १७ जुलैला रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली. ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक राजवंत आठवले यांना जुगार अड्ड्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तातडीने एएसआय मोरशिंग राठोड, …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मंगरूळ (ता. चिखली) शिवारात जुगार अड्ड्यावर छापा मारून अंढेरा पोलिसांनी ९ जुगाऱ्यांना पकडले. त्‍यांच्‍याकडून २ लाख ८ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १७ जुलैला रात्री नऊच्‍या सुमारास करण्यात आली.

ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक राजवंत आठवले यांना जुगार अड्ड्याची गोपनीय माहिती मिळाली. त्‍यांनी तातडीने एएसआय मोरशिंग राठोड, पोकाँ श्री. झिने, पोकाँ श्री. हुसे यांना खासगी वाहनात बसवून थेट मंगरूळ शिवार गाठले. तेथील जुगार अड्ड्यावर छापा मारला. काही जण पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्‍यांच्‍याकडून तीन मोटारसायकली, नगदी रुपये असा एकूण दोन लाख आठ हजार दहा रुपये ऐवज जप्त केला. घटनेची तक्रार स्वतः ठाणेदारांनी डायरी अंमलदार पंजाबराव साखरे यांच्याकडे दाखल केली. जीवन अनिल गवते, दाऊद खाँ इलीयार खाँ पठाण, स्वप्निल अनिल गवते, बंडू मनोहर भुतेकर, प्रताप अण्णाभाऊ जराड, समाधान गोपाळा बोर्डे, संतोष सुपडा बोर्डे, गणेश एकनाथ शिंदे, विष्णू भास्कर सुरोशे (सर्व रा. मंगरूळ) अशी पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.