भाऊजीची नजर फिरली… अल्पवयीन मुलीचा विनयभंग! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायकोच्या लहान बहिणीवरच भाऊजीची नजर फिरली. त्याने या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना खामगाव तालुक्यातील रोहणा येथे समोर आली आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नरीन जीपकार भोसले (30, रा. अंढेरा ता. देऊळगाव राजा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरीन हा बायकोच्या माहेरी रोहणा (ता. खामगाव) येथे …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायकोच्या लहान बहिणीवरच भाऊजीची नजर फिरली. त्याने या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना खामगाव तालुक्यातील रोहणा येथे समोर आली आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नरीन जीपकार भोसले (30, रा. अंढेरा ता. देऊळगाव राजा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरीन हा बायकोच्या माहेरी रोहणा (ता. खामगाव) येथे राहतो. 29 डिसेंबरला पीडितेचे आई- वडील आणि भाऊ बाहेरगावी गेले असल्याने घरी पीडिता, पीडितेच्या मोठ्या भावाचा लहान मुलगा, पीडितेची मोठी बहीण आणि आरोपी असे चौघे जण होते. पीडिता लहान बाळाला घेऊन झोपली असता दुपारी 2 च्या सुमारास आरोपीने पीडितेला वाईट उद्देशाने स्पर्श केला व पीडितेच्या अंगावर जाऊन बसला. पीडितेने आरडा ओरड केली असता मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या मोठ्या बहिणीस लाथ मारून पळून गेला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान राठोड करत आहेत.