भररस्‍त्‍यात पोतडीतून विकत होता दारूच्‍या बाटल्‍या; खरेदीसाठी तळीरामांची गर्दी!; चिखलीतील प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली बसस्थानक परिसरात भररस्त्यावर देशी व विदेशी दारू विकणाऱ्या एका व्यक्तीस बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. काल, 8 एप्रिलच्या रात्री 8 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अभिजीत दीपिकासिंग ठाकूर (रा. पुंडलिकनगर, चिखली) असे आरोपीचे नाव आहे. चिखली बसस्थानक जवळील हॉटेल आकाशजवळ एक व्यक्ती हातात पोतडी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली बसस्थानक परिसरात भररस्त्यावर देशी  व विदेशी दारू विकणाऱ्या एका व्यक्तीस बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. काल, 8 एप्रिलच्‍या रात्री 8 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अभिजीत दीपिकासिंग ठाकूर (रा. पुंडलिकनगर, चिखली) असे आरोपीचे नाव आहे.

चिखली बसस्थानक जवळील हॉटेल आकाशजवळ एक व्यक्ती हातात पोतडी भरून काहीतरी विकत आहे, अशी माहिती गोपनीय सूत्रांकडून एलसीबीला मिळाली होती. एलसीबीने छापा मारून तपासणी केली असता मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती आणि त्याच्‍या भोवती नागरिकांची गर्दी पोलिसांना दिसली. पोतडीत देशी व विदेशी दारूच्या शिशा भरलेल्या मिळून आल्या. त्याच्याकडून एकूण 6265 रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त करीत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.