भरधाव मालवाहू वाहनाची ऑटोला धडक; चालकासह दोन प्रवासी गंभीर; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव मालवाहू वाहनाने ऑटोला धडक दिली. यात ऑटो चालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना १९ जुलैला सायंकाळी अटाळी- शहापूर रोडवरील वहाळा खुर्द शिवारात घडली. याप्रकरणी मालवाहू वाहनचालकाविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात काल, २० जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटाळी- शहापूर रोडवर शेख अमीर शेख …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव मालवाहू वाहनाने ऑटोला धडक दिली. यात ऑटो चालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना १९ जुलैला सायंकाळी अटाळी- शहापूर रोडवरील वहाळा खुर्द शिवारात घडली. याप्रकरणी मालवाहू वाहनचालकाविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात काल, २० जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटाळी- शहापूर रोडवर शेख अमीर शेख सत्तार (२९, रा. अटाळी, ता. खामगाव) हा त्याच्या मालकीचा ऑटो (क्र. एमएच २८ टी २४०७) चालवतो. १९ जुलैला शेख अमीर हा ऑटोमध्ये प्रवासी घेऊन अटाळीवरून शहापूरला जात होता. त्‍याचवेळी भरधाव ४०७ वाहनाने (क्र. सीजी १५, सी २५०९) ऑटोला मागून धडक दिली. यात शेख अमीर याच्‍यासह जुबेर शहा अनिस शहा (रा. अटाळी) व उद्धव बरडे (रा. तांदळी, ता. पातूर) हे गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथमोपचारासाठी खामगाव येथे सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी जुबेर शहा व उद्धव बरडे यांना अकोला येथे हलविण्यात आले. याप्रकरणी ऑटोचालक शेख आमिर शेख सत्तार याच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मालवाहू वाहनाचा चालक रामेश्वर विष्णू परकाळे (रा. वहाळा, ता. खामगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.