भरधाव मालवाहू पिकअपची दुचाकीस धडक; पती-पत्‍नी जागीच ठार; संग्रामपूर तालुक्‍यातील भीषण अपघात

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीला उडवले. यात पती – पत्नी जागीच ठार झाले तर मालवाहूचालकही जखमी झाला आहे. ही घटना आज, 1 जुलै रोजी सकाळी 10 च्या सुमारास जळगाव – टुनकी रस्त्यावरील लाडनापूर फाट्याजवळ (ता. संग्रामपूर) घडली. तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील गोविंदा किसन तायडे व त्यांची पत्नी प्रमीला किसन तायडे …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव मालवाहू पिकअ‍प वाहनाने दुचाकीला उडवले. यात पती – पत्नी जागीच ठार झाले तर मालवाहूचालकही जखमी झाला आहे. ही घटना आज, 1 जुलै रोजी सकाळी 10 च्या सुमारास जळगाव – टुनकी रस्‍त्‍यावरील लाडनापूर फाट्याजवळ (ता. संग्रामपूर) घडली.

तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील गोविंदा किसन तायडे व त्यांची पत्‍नी प्रमीला किसन तायडे हे दोघे दुचाकीने (क्र. एमएच 30 पी 5649) जळगावकडून टुनकी कडे जात असताना टुनकीकडून येणाऱ्या मालवाहू पिकअ‍प वाहनाचा (क्र. एमएच 15 इजी 1961) चालक शे. सलीम शे. रहीम याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीस जोरदार धडक दिली. यात गोविंद तायडे यांच्या छातीला व हाताला जबर मार लागला तर प्रमिला तायडे यांच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. मालवाहू वाहनचालक जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस प्राथमिक उपचारासाठी भरती केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याल शेगाव येथे हलविण्यात आले.