भरधाव टिप्परने उडवले; दुचाकीस्वार जागीच ठार, तरुणीसह दोघे जखमी, केळवद फाट्यावरील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव रेतीच्या टिप्परने मोटारसायकलला उडवले. यात मोटारसायकलस्वार जागीच ठार तर त्याच्या मागे बसलेली तरुणी आणि टिप्परमधील दोघे असे तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा- चिखली रोडवरील केळवद फाट्याजवळ आज, 12 जूनच्या दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. सर्वेश मिलिंद जोशी (28, रा. पाठक गल्ली, बुलडाणा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव रेतीच्या टिप्परने मोटारसायकलला उडवले. यात मोटारसायकलस्वार जागीच ठार तर त्‍याच्‍या मागे बसलेली तरुणी आणि टिप्परमधील दोघे असे तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा- चिखली रोडवरील केळवद फाट्याजवळ आज, 12 जूनच्‍या दुपारी साडेचारच्‍या सुमारास घडली.

सर्वेश मिलिंद जोशी (28, रा. पाठक गल्ली, बुलडाणा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो साक्षी संजय कपाटे (19, रा. आरास ले आऊट, बुलडाणा) हिच्‍यासह बुलडाण्याहून चिखलीकडे चालला होता. त्‍याचवेळी रेती घेऊन टिप्पर बुलडाण्याकडे येत होता. केळवदजवळ टिप्परने मोटारसायकलला उडवले. त्‍याआधी मोटारसायकलला वाचविण्याच्‍या प्रयत्‍नात टिप्परही उलटले.

टिप्परमध्ये बसलेले दोघे मजूर रमेश बाबुराव चव्‍हाण (45, रा. पळसखेड नाईक, ता. बुलडाणा) व श्याम बाबुराव चव्‍हाण (42, रा. पळसखेड नाईक) हे सख्खे भाऊ आणि दुचाकीवरील साक्षी असे तिघे जखमी झाले. जखमींना बुलडाणा येथील सामान्य रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.