भरदुपारी गावात तलवार घेऊन फिरत होता, पोलिसांनी केले जेरबंद; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरदुपारी गावात हातात तलवार आणि चाकू घेऊन फिरणाऱ्या युवकाविरोधात खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज दिलीप खेडेकर(32, रा. गारडगाव ता. खामगाव) असे आरोपीचे नाव आहे. मनोज गावात तलवार आणि चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून खामगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी काल, 14 जून रोजी दुपारी …
 
भरदुपारी गावात तलवार घेऊन फिरत होता, पोलिसांनी केले जेरबंद; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरदुपारी गावात हातात तलवार आणि चाकू घेऊन फिरणाऱ्या युवकाविरोधात खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज दिलीप खेडेकर(32, रा. गारडगाव ता. खामगाव) असे आरोपीचे नाव आहे. मनोज गावात तलवार आणि चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून खामगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी काल, 14 जून रोजी दुपारी गारडगाव येथे जाऊन त्‍याच्या घराची तपासणी केली असता 1 लोखंडी मुठीची धारदार तलवार (किंमत 1 हजार) व 2 चाकू (किंमत 300 रुपये) असे साहित्य जप्त करून मनोजला अटक करण्यात आली.