बोलेरो पिकअपने दुचाकीस्वार तरुणास उडवले, गंभीर जखमी; बुलडाणा-चिखली रोडवरील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला उडवले. यात २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज, २ जुलैला रात्री सव्वा आठच्या सुमारास चिखली-बुलडाणा रोडवरील अंत्री फाट्याजवळ घडला. अंकित दत्तात्रय पाटील (रा. खुपगाव, ता. बुलडाणा) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तो केळवदवरून बुलडाण्याकडे जात होता. अंत्री फाट्याजवळ त्याला बोलेरो पिकअपने उडवले. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला उडवले. यात २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज, २ जुलैला रात्री सव्वा आठच्‍या सुमारास चिखली-बुलडाणा रोडवरील अंत्री फाट्याजवळ घडला.

अंकित दत्तात्रय पाटील (रा. खुपगाव, ता. बुलडाणा) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तो केळवदवरून बुलडाण्याकडे जात होता. अंत्री फाट्याजवळ त्‍याला बोलेरो पिकअपने उडवले. बोलेरो पिकअप वाहन बकऱ्या घेऊन चिखलीकडे जात होते. अपघातानंतर पिकअपचा चालक पळून गेला. जखमी तरुणाला बुलडाण्याला हलविण्यात आले.