बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला; मलकापूर तालुक्‍यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेहच आढळला. लोणवडी (ता. मलकापूर) येथे 7 जुलैच्या रात्री ही घटना समोर आली. नीलेश शिवाजी बावस्कार (23, रा. लोणवडी) असे या तरुणाचे नाव आहे. नीलेश 5 जुलैला घरून कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला होता. तो हरवल्याची तक्रार 6 जुलैला मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेहच आढळला. लोणवडी (ता. मलकापूर) येथे 7 जुलैच्या रात्री ही घटना समोर आली. नीलेश शिवाजी बावस्कार (23, रा. लोणवडी) असे या तरुणाचे नाव आहे.

नीलेश 5 जुलैला घरून कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला होता. तो हरवल्याची तक्रार 6 जुलैला मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र काल रात्री लोणवडी शिवारातीलच शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळला. गावातीलच सौरभ विलास बावस्कर यांना मृतदेहच पाण्यावर तरंगताना दिसल्याने त्यांनी लगेच मलकापूर ग्रामीण पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.