बेडरूममधून बाहेर येत नसल्याने दरवाजा तोडला असता दिसले धक्कादायक दृश्य!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 26 वर्षीय विवाहित युवकाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुलडाणा शहरातील चांडक ले आउटमध्ये आज, 28 मार्च रोजी दुपारी 11.30 च्या सुमारास घडली. पवन अजबराव जाधव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. आज सकाळी तो त्याच्या बेडरूममध्ये गेला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 26 वर्षीय विवाहित युवकाने राहत्या  घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुलडाणा शहरातील चांडक ले आउटमध्ये आज, 28 मार्च रोजी दुपारी 11.30 च्या सुमारास  घडली.

पवन अजबराव जाधव असे  आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. आज सकाळी तो  त्याच्या बेडरूममध्ये गेला होता. मात्र बराच वेळ होऊन तो बाहेर आला नसल्याचे पाहून घरातील सदस्यांनी जाऊन बघितले असता बेडरुमचा  दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाजा तोडला असता त्यांना पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस स्टेशनचे एएसआय आप्पाराव गवई यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.