बुलडाण्याच्‍या कारागृहातून आरोपी पळाला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोस्को कायद्याअंतर्गत शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या तरुणाने बुलडाण्याच्या ग्रामसेवक प्रशिक्षण प्रबोधिनीतील तात्पुरत्या कारागृहातून आज, 29 एप्रिलच्या पहाटे पावणेसहाच्या सुमारास पलायन केले. विनोद श्यामराव वानखेडे (रा. मांडोली, ता. बाळापूर, जि. अकोला) असे या आरोपीचे नाव आहे. कोरोनामुळे त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. शौचालयाचे लोखंडी गज तोडून तो फरारी झाला. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पोस्को कायद्याअंतर्गत शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केलेल्या तरुणाने बुलडाण्याच्‍या ग्रामसेवक प्रशिक्षण प्रबोधिनीतील तात्‍पुरत्या कारागृहातून आज, 29 एप्रिलच्‍या पहाटे पावणेसहाच्‍या सुमारास पलायन केले.

विनोद श्यामराव वानखेडे (रा. मांडोली, ता. बाळापूर, जि. अकोला) असे या आरोपीचे नाव आहे. कोरोनामुळे त्‍याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. शौचालयाचे लोखंडी गज तोडून तो फरारी झाला. त्‍याची शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.