पोलिसांवर हल्ला चढवून जमावाने पळवून लावले चोरीच्‍या गुन्ह्यातील 2 आरोपी!; पीएसआय जखमी, 13 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, लोणार तालुक्‍यातील खळबळजनक घटना

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलिसांच्या जीपवर हल्ला चढवून चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना जमावाने पळवून नेल्याची खळबळजनक घटना खापरखेड घुले (ता. लोणार) येथे काल, 13 मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी 13 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत पोलीस उपनिरिक्षक श्रीराम व्यवहारे यांच्यासह सोबतचे कर्मचारीही जखमी झाले …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पोलिसांच्‍या जीपवर हल्ला चढवून चोरीच्‍या गुन्‍ह्यातील आरोपींना जमावाने पळवून नेल्याची खळबळजनक घटना खापरखेड घुले (ता. लोणार) येथे काल, 13 मे रोजी दुपारी साडेचारच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी 13 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. या घटनेत पोलीस उपनिरिक्षक श्रीराम व्यवहारे यांच्‍यासह सोबतचे कर्मचारीही जखमी झाले आहेत.

या प्रकरणात पोलीस नाईक अर्जुन सांगळे यांनी तक्रार दिली आहे. चंदू रामचंद्र चव्हाण, रामनारायण डिगांबर चव्हाण, दीपक सुरेश राठोड, सुरेश अंकुश डोंगरे, ज्ञानेश्वर मोहन राठोड, संतोष विष्णू राठोड, सौ. ज्योती चंदू चव्हाण, सौ. मीना सुभाष चव्हाण, गणेश संतोष राठोड, सुनिल चंदू राठोड, गजानन विष्णू राठोड (सर्व रा. खापरखेड घुले), पूजा रोहिदास चव्हाण (रा.येवती) अशी आरोपींची नावे आहेत.

चोरीच्‍या गुन्ह्यातील आरोपींच्‍या शोधासाठी काल दुपारी ठाणेदार एल. डी. तावरे, पोलीस उपनिरिक्षक श्रीराम व्यवहारे, पोहेकाँ किसन राठोड, पोकाँ यशवंत जैवळ, पोकाँ रोहिदास पंढरे, पोकाँ शिवाजी दराडे, चालक एएसआय जिवा राठोड खापरखेड घुले येथे गेले होते. बाळू ऊर्फ राजू विष्णू राठोड व विलास रोहिदास चव्हाण यांना ताब्‍यात घेण्यात आले. त्‍यांना सरकारी वाहनात बसवून पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींच्‍या नातेवाइकांनी गाडी अडवली. आरोपींच्‍या सुटकेसाठी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यात पीएसआय श्रीराम व्यवहारे यांच्‍या उजव्‍या हाताच्‍या मनगटाला दगड लागल्याने ते जखमी झाले.  अन्य पोलीसही जखमी झाले. आरोपींनी सुद्धा वाहनात पोलिसांशी हातापायी करून पळून जाण्यासाठी हल्ला चढवला. आरोपींनी गाडीतून पळवून नेण्यात आले. या संपूर्ण घटनेचे पोकाँ रोहिदास पंढरे यांनी मोबाइलमध्ये चित्रिकरण केले आहे. तपास ठाणेदार एल. डी. तावरे करत आहेत.