पिंप्री काेरडे घराला आग, साहित्य जळून खाक; शाॅर्ट सर्किटमुळे लागली आग; एक लाख रुपयांचे नुकसान....
Updated: Nov 4, 2025, 11:41 IST
उदयनगर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथून जवळच असलेल्या पिंप्री काेरडे येथील घराला शाॅर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील नगदी रोख, शालेय साहित्य, पुस्तके, टीव्ही, कुलर, कागदपत्रेसह आदी सामान जळून खाक होत १ लाख रुपयाचे नुकसान झाले.ही घटना ३ नोव्हेबर रोजी दुपारी घडली.
पिंप्री कोरडे येथील किशोर शंकर वानखडे यांचे घराला उपरोक्त वेळी अचानक शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागली. त्यामध्ये घरातील टीव्ही, मोबाईल हँडसेट १ नग, नगदी १० हजार रुपये, शालेय दप्तर, पुस्तके, कागदपत्रे, कुलर, अन्न धान्य, दाळ दाना, घरातील इलेक्ट्रिक फिटिंगसह आदी सामान जळून खाक झाले.घरातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच उषाबाई कोंडेकर, मुकेश वानखडे, विजय कोंडेकर, अरुण चांदोकार, केशव कोंडेकर, अमोल वानखडेसह आदींनी धावपळ करून आगीवर नियंत्रण मिळवले. ताेपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झाले होते.यामध्ये जवळपास १ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे वानखडे यांनी सांगितले.
