पाण्याच्‍या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्‍यू; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराच्या बांधकामासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज, 31 मार्चला सकाळी साडेनऊच्या सुमारास बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडली. जागृती परमेश्वर साखरे असे या चिमुकलीचे नाव आहे. तिच्या घरासमोर विलास अजाबराव रिंढे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. चिमुकली सकाळच्या सुमारास खेळत …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घराच्‍या बांधकामासाठी बांधलेल्या पाण्याच्‍या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना आज, 31 मार्चला सकाळी साडेनऊच्‍या सुमारास बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडली.

जागृती परमेश्वर साखरे असे या चिमुकलीचे नाव आहे. तिच्‍या घरासमोर विलास अजाबराव रिंढे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. चिमुकली सकाळच्या सुमारास खेळत असताना पाण्याच्‍या टाकीत पडली. बराच वेळ होऊनही ती दिसून न आल्याने शोधाशोध करण्यात आली असता ती टाकीत पडलेली दिसून आली. तातडीने तिला जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात आणण्यात आले. मात्र आधीच मृत्‍यू झालेला असल्‍याचे डॉक्‍टरांनी तपासून सांगितले. तपास पो.हे.कॉ.शकील खान करत आहेत.