पत्‍नीवर आरोप… देऊळगाव राजात लॅबचालकाला सासरच्यांची घरी येऊन बेदम मारहाण!; पाच महिन्यांनी ९ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खासगी लॅबचालकाला घरात घुसून सासरच्या मंडळींनी मारहाण केली होती. त्यावरून देऊळगाव राजा पोलिसांनी तब्बल ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना देऊळगाव राजा शहरातील सिव्हिल कॉलनीत १६ फेब्रुवारीला घडली होती. कैलास तुळशीराम दहातोंडे (३३, रा. सिव्हील कॉलनी, देऊळगाव राजा) यांनी फेब्रुवारीतच तक्रार दिली होती. मात्र हे प्रकरण चौकशीवर …
 
पत्‍नीवर आरोप… देऊळगाव राजात लॅबचालकाला सासरच्यांची घरी येऊन बेदम मारहाण!; पाच महिन्यांनी ९ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खासगी लॅबचालकाला घरात घुसून सासरच्या मंडळींनी मारहाण केली होती. त्‍यावरून देऊळगाव राजा पोलिसांनी तब्‍बल ९ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना देऊळगाव राजा शहरातील सिव्हिल कॉलनीत १६ फेब्रुवारीला घडली होती. कैलास तुळशीराम दहातोंडे (३३, रा. सिव्हील कॉलनी, देऊळगाव राजा) यांनी फेब्रुवारीतच तक्रार दिली होती. मात्र हे प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आले होते. अखेर काल, २० जुलैला ज्ञानेश्वर अंबादास डुकरे, कृष्णा ज्ञानेश्वर डुकरे, परशुराम ज्ञानेश्वर डुकरे, आशा ज्ञानेश्वर डुकरे, सौ. सुरेखा कैलास दहातोंडे, विठ्ठल अंबादास डुकरे, नाना शेजूळ, पांडूरंग नरवडे, अण्णा शेळके यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला.

दहातोंडे यांच्‍या तक्रारीनुसार, पत्‍नीवर आरोप करून कैलास दहातोंडे यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली होती. १६ फेब्रुवारीला दुपारी एकच्‍या सुमारास पत्नी, सासू, सासरे तसेच इतर आठ ते दहा जण त्‍यांच्‍या घरी आले होते. शिविगाळ करत घरात घुसून त्‍यांनी दहातोंडे यांना मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्‍यांच्‍या आईला सुध्दा परशुराम डुकरे याने अश्लील शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच दिवशी रात्री सव्वा आठला सासरकडील मंडळींनी पुन्‍हा घरी येऊन लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. यात दहातोंडे यांच्‍या नाकाला फ्रॅक्‍चर झाले होते.