नैसर्गिक संकटांसाठी जिल्हा प्रशासन सज्‍ज! जिल्हास्‍तरावर २४ तास नियंत्रण कक्ष; तालुका केंद्रावरही बचाव पथक; आपत्ती आल्यास “या’ नंबरवर मिळेल तातडीची मदत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज, २३ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आपत्ती निवारण व्यवस्था संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी कशी सज्ज झाली आहे, याची माहिती Buldana Live ने घेतली. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली …
 
नैसर्गिक संकटांसाठी जिल्हा प्रशासन सज्‍ज! जिल्हास्‍तरावर २४ तास नियंत्रण कक्ष; तालुका केंद्रावरही बचाव पथक; आपत्ती आल्यास “या’ नंबरवर मिळेल तातडीची मदत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज, २३ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आपत्ती निवारण व्यवस्‍था संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी कशी सज्‍ज झाली आहे, याची माहिती Buldana Live ने घेतली.

जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती निवारण कक्ष आहे. तालुकास्तरावर प्रत्येक तहसीलदारांच्या नेतृत्वात आपत्ती निवारण बचाव पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा व तालुका स्तरावर असणारे आपत्ती निवारण कक्ष २४ तास कार्यरत आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये ८ असे एकूण २४ कर्मचारी या कक्षांत कार्यरत आहेत. पावसामुळे संभाव्य आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आठवड्यातील आठही दिवस हा कक्ष सुरू आहे.

जिल्हा स्तरावर तयार करण्यात आलेल्या बचाव पथकात १० पोलीस कर्मचारी, १० होमगार्ड याशिवाय अग्निशामक दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभागाचे कर्मचारी यांचा समावेश आहे. आपत्ती निवारणाच्या दृष्टीने रबर बोट, लाईफ जॅकेट, वायर रोप या साहित्याचे तालुकास्तवरील बचाव पथकाला वितरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावरील बचाव पथकाकडून परिस्थिती नियंत्रणात येत नसेल तर त्यांच्या मदतीला लगेच जिल्हास्तरावरील बचाव पथकाला पाठविले जाते. जिल्ह्यात कुठेही आपत्ती आल्यास तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : ०७२६२-२४२६८३
टोल फ्री क्रमांक : १०७७