नैराश्यातून युवकाने घेतला गळफास; लग्न जुळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नैराश्यातून एका युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 11 फेब्रुवारीच्या संध्याकाळी किनोळा (ता. मोताळा) शिवारात घडली. दिनेश शिवाजी शिंदे (28, रा. सारोळापीर ता. मोताळा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दिनेश हा धामणगाव बढे येथील एका पतसंस्थेत शिपाई होता. रोज तो सारोळापीर ते …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नैराश्यातून एका युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 11 फेब्रुवारीच्या संध्याकाळी किनोळा (ता. मोताळा) शिवारात घडली. दिनेश शिवाजी शिंदे (28, रा. सारोळापीर ता. मोताळा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दिनेश हा धामणगाव बढे येथील एका पतसंस्थेत शिपाई होता. रोज तो सारोळापीर ते धामणगाव बढे असे येणे जाणे करत होता. दरम्यान काल संध्याकाळी 6 च्या सुमारास त्याने किनोळा शिवारातील एका शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्न जुळत नसल्याने त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता दिनेशच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे.