निंबाच्या झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; लोणी गुरव येथील घटना

खामगाव (भागवत राऊत) ः लोणी गुरव (ता. खामगाव) येथील 34 वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 4 जानेवारीला घडली. काल खामगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. नितीन वसंता उबाळे (रा. लोणी गुरव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. नितीनने दोरीच्या साह्याने गावाजवळ असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतला. श्रीकृष्ण …
 

खामगाव (भागवत राऊत) ः लोणी गुरव (ता. खामगाव) येथील 34 वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 4 जानेवारीला घडली. काल खामगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. नितीन वसंता उबाळे (रा. लोणी गुरव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. नितीनने दोरीच्या साह्याने गावाजवळ असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतला. श्रीकृष्ण सुखदेव ढबाले (45, रा. लोणी गुरव) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपास एनपीसी राजेश गाडेकर आहेत. फिर्याद एएसआय शत्रुघ्न बर्डे यांनी दाखल करून घेतली.