नंगी तलवार घेऊन रस्‍त्‍यावर धिंगाणा, पोलिसांना लोटपोट, तलवारीने कापून टाकण्याची धमकी!; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नंगी तलवार घेऊन भर रस्त्यात ३० वर्षीय युवक धिंगाणा घालत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना धाक दाखवून घाबरवत होता. तामगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पातुर्डा फाटा (ता. संग्रामपूर) गाठून त्याला पकडले व विचारणा केली असता तो म्हणाला, तुम्ही येथून निघून जा. माझ्या नादी लागू नका. माझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला खूप गुन्हे दाखल …
 
नंगी तलवार घेऊन रस्‍त्‍यावर धिंगाणा, पोलिसांना लोटपोट, तलवारीने कापून टाकण्याची धमकी!; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नंगी तलवार घेऊन भर रस्‍त्‍यात ३० वर्षीय युवक धिंगाणा घालत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना धाक दाखवून घाबरवत होता. तामगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्‍यांनी पातुर्डा फाटा (ता. संग्रामपूर) गाठून त्‍याला पकडले व विचारणा केली असता तो म्‍हणाला, तुम्ही येथून निघून जा. माझ्या नादी लागू नका. माझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला खूप गुन्हे दाखल आहेत. मी पोलिसांना घाबरत नाही…पोलीस त्‍याच्‍या हातातून तलवार घेत असताना त्‍याने पोलिसांनाच लोटपोट केली व तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिली. ही धक्‍कादायक घटना १० ऑगस्‍टच्‍या रात्री साडेआठच्‍या सुमारास घडली. तामगाव पोलिसांनी त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करत ताब्‍यात घेतले आहे.

नापोकाँ प्रमोद आत्माराम मुळे यांनी या प्रकरणात तक्रार दिली. सोपान प्रल्हाद भिवटे (रा.खिरोडा ता. संग्रामपूर) असे आरोपीचे नाव आहे. १० ऑगस्‍टला नापोकाँ श्री. मुळे आणि पोहेकाँ रामकिसन माळी वरवट फाटा ते खिरोडा पुलापर्यंत मोटारसायकलने पेट्रोलिंग करत होते. रात्री साडेआठला ते पातुर्डा फाटा येथे आले असता त्‍यांना सोपान भिवटे हातात तलवार घेऊन रस्‍त्‍यावर धिंगाणा घालत असल्याचे दिसले होते. त्‍याने पोलिसांची शर्टची काॅलर पकडली व लोटपाट केली. त्यामुळे पोलिसांच्‍या शर्टचे बटन तुटले. तुम्ही पोलीस माझे काहीच करू शकत नाही, असे म्‍हणून त्‍याने शिविगाळही केली. तलवारीने कापून टाकण्याची धमकीही दिली. ग्रामस्‍थ सचिन दिलीप भिडे, किशोर दिलीप भिडे, जितेंद्र काशिराम सुभेदार, विशाल दाणे यांच्‍या मदतीने त्‍याला पकडण्यात आले.