धरणात बुडून तरुणाचा मृत्‍यू; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २३ वर्षीय तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना सावखेड भोई (ता. देऊळगाव राजा) शिवारात आज, ८ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास घडली. उमेश किरण मुळे (रा. सावखेड भोई) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर भानुदास जायभाये (रा. सावखेड तेजन, ता. सिंदखेड राजा) यांची सावखेड भोई शिवारात …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः २३ वर्षीय तरुणाचा धरणात बुडून मृत्‍यू झाला. ही घटना सावखेड भोई (ता. देऊळगाव राजा) शिवारात आज, ८ जुलैला दुपारी दोनच्‍या सुमारास घडली.

उमेश किरण मुळे (रा. सावखेड भोई) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर भानुदास जायभाये (रा. सावखेड तेजन, ता. सिंदखेड राजा) यांची सावखेड भोई शिवारात शेती आहे. या शेतीच्‍या शेजारी धरण आहे. ते शेतात घोडा व जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेले असता त्‍यांना उमेशचा मृतदेह तरंगताना दिसला. त्‍यांनी तातडीने देऊळगाव राजा पोलिसांना कळवले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. तपास पोहेकाँ गजानन केदार करत आहेत. ही आत्‍महत्‍या की अपघात याचा तपास केला जात आहे.