धक्‍कादायक… लव्‍ह यू जान लिहून नगरसेविकेचा फोटो टाकला फेसबुकवर!; विकृताचे कृत्‍य, नांदुऱ्यातील प्रकार

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगरसेविकेच्या फोटोवर आय लव्ह यू जान असे लिहून फेसबुकवर टाकल्याचा विकृतपणा नांदुऱ्यात समोर आला असून, या प्रकरणी नगरसेविकेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून काल, 13 मे रोजी रात्री नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्यांच्या नावाचे हे फेसबुक खाते आहे, त्यांनाही हा प्रकार माहीत नव्हता. त्यांच्या नावाने खोटे खाते तयार करून अशापद्धतीने …
 
धक्‍कादायक… लव्‍ह यू जान लिहून नगरसेविकेचा फोटो टाकला फेसबुकवर!; विकृताचे कृत्‍य, नांदुऱ्यातील प्रकार

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः नगरसेविकेच्‍या फोटोवर आय लव्‍ह यू जान असे लिहून फेसबुकवर टाकल्‍याचा विकृतपणा नांदुऱ्यात समोर आला असून, या प्रकरणी नगरसेविकेच्‍या भावाने दिलेल्या तक्रारीवरून काल, 13 मे रोजी रात्री नांदुरा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

ज्‍यांच्‍या नावाचे हे फेसबुक खाते आहे, त्‍यांनाही हा प्रकार माहीत नव्‍हता. त्‍यांच्‍या नावाने खोटे खाते तयार करून अशापद्धतीने नगरसेविकेची बदनामी करण्याचा प्रयत्‍न झाला. नगरसेविकेच्‍या भावाला त्‍याच्‍या मित्राने हा प्रकार सर्वप्रथम सांगितला. त्‍याने स्‍क्रिनशॉट काढूनच पाठवला. त्‍यानंतर ज्‍याच्‍या खात्‍यावरून हा फोटो शेअर करण्यात आला होता. त्‍याला काल सायंकाळी नगरसेविकेच्‍या भावाने जाऊन विचारले असता त्‍याने अशी कोणतीच पोस्‍ट आपण शेअर केली नसल्याचे सांगितले. त्‍यामुळे पोलिसांत तक्रार देण्यात आली.