दोन लाखांसाठी मलकापूरच्‍या विवाहितेचा मांडला छळ, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत विवाहितेचा छळ मांडल्याची घटना मलकापूर शहरात समोर आली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. तेजश्री अतुल पाटील (रा. मलकापूर) हिने या प्रकरणात तक्रार दिली. तिचे लग्न धरणगाव (ता. मलकापूर) येथील अतुल प्रभाकर पाटील …
 
दोन लाखांसाठी मलकापूरच्‍या विवाहितेचा मांडला छळ, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत विवाहितेचा छळ मांडल्याची घटना मलकापूर शहरात समोर आली आहे. विवाहितेच्‍या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. तेजश्री अतुल पाटील (रा. मलकापूर) हिने या प्रकरणात तक्रार दिली. तिचे लग्‍न धरणगाव (ता. मलकापूर) येथील अतुल प्रभाकर पाटील याच्‍यासोबत २५ एप्रिल २०१८ ला झाले होते. आई – वडिलांनी लग्नातील सोपस्काराप्रमाणे मौल्यवान वस्तू दिल्या होत्या. मात्र त्‍यावरही समाधान न झालेल्या सासरे मधुकर तुकाराम पाटील, सासू विद्या, जेठ प्रफुल्ल (सर्व रा. धरणगाव), पती अतुल, नणंद मानसी वैभव कोलते, नंदोई वैभव मांगो कोलते (ह. मु. देहू हवेली पुणे) यांनी माहेरवरून २ लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत शारीरिक व मानसिक छळ केला. या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या या सहा जणांविरुध्द गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ सचिन अरुण पाटील करत आहेत.