दुचाकीस्वार मजूर महिलांना धडकला; युवक ठार, दोन महिला जखमी; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकी घसरून युवक जागीच ठार तर रस्त्यावर वाहनाची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन महिला जखमी झाल्या. ही घटना खामगाव तालुक्यातील अटाळी- विहिगाव रोडवर आज, 17 जून रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली. विकास श्रीराम सुरवाडे (29, रा. बोरी अडगाव ता. खामगाव) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुचाकी घसरून युवक जागीच ठार तर रस्त्यावर वाहनाची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन महिला जखमी झाल्या. ही घटना खामगाव तालुक्यातील अटाळी- विहिगाव रोडवर आज, 17 जून रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली.

विकास श्रीराम सुरवाडे (29, रा. बोरी अडगाव ता. खामगाव) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. विकास दुपारी त्‍याच्‍या दुचाकीने (क्र. एमएच 28 डब्ल्यू 8896) खामगाव वरून बोरी आडगावकडे जात होता. अटाळी- विहिगाव रोडवरील वीट भट्टीजवळील वळणावर त्याची दुचाकी घसरली. यात त्‍याचा जागीच मृत्यू झाला. त्याची दुचाकी रस्त्यावर वाहनाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिला मजुरांच्या अंगावर गेली. यात दोन महिला मजूर किरकोळ जखमी झाल्या.