दुचाकीवरून घेऊन चालला होता गुटखा, खामगावाला एकाला पकडले!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटरसायकलवरून गुटखा घेऊन जाणाऱ्यास शिवाजीनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याजवळून व नंतर त्याच्या घरातून विमल पान मसाला व दुचाकी असा एकूण 80 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज, 30 एप्रिलला सकाळी 9.30 च्या सुमारास खामगाव शहरातील फरशी भागात करण्यात आली. सूर्यकांत विजयकुमार पुरवार (रा. जुनी …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोटरसायकलवरून गुटखा घेऊन जाणाऱ्यास शिवाजीनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याजवळून व नंतर त्‍याच्‍या घरातून विमल पान मसाला व दुचाकी असा एकूण 80 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज, 30 एप्रिलला सकाळी 9.30 च्‍या सुमारास खामगाव शहरातील फरशी भागात करण्यात आली.  सूर्यकांत विजयकुमार पुरवार (रा.  जुनी मशिदीजवळ, सराफा, खामगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोकाँ बाळकृष्ण फुंडकर यांनी या प्रकरणात दिलेल्या तक्रारीवरून पुरवारविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.