दिवसभरातील चौथी आत्‍महत्‍या!; नांदुरा तालुक्‍यातही वृद्धाने घेतला गळफास

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यात युवक, वृद्ध, मोताळा तालुक्यात शिक्षिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नांदुरा तालुक्यातील कोदरखेड नवीन गावठाण जवळील शेतातही एका वृद्धाने निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. (यापूर्वीच्या आत्महत्येच्या बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः https://www.buldanalive.com/category/crime-dairy/ )विठ्ठल पुंडलिक शेलकर (५५, रा. श्रीधरनगर घाटपुरी खामगाव) …
 

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्‍यात युवक, वृद्ध, मोताळा तालुक्‍यात शिक्षिकेने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना ताजी असतानाच नांदुरा तालुक्यातील कोदरखेड नवीन गावठाण जवळील शेतातही एका वृद्धाने निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. (यापूर्वीच्‍या आत्‍महत्‍येच्या बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्‍लिक करा ः https://www.buldanalive.com/category/crime-dairy/ )
विठ्ठल पुंडलिक शेलकर (५५, रा. श्रीधरनगर घाटपुरी खामगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. सुनील नामदेव ढोले (४२, रा. अलमपूर ह. मु. शिवशंकरनगर नांदुरा) यांनी घटनेची माहिती नांदुरा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर उमाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकार, होमगार्ड सोनोने यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. तूर्त नांदुरा पोलिसांनी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. आत्‍महत्‍येचे कारण वृत्त लिहीपर्यंत समोर येऊ शकले नाही.