त्‍या अपघाताचा तिसरा बळी; उपचारादरम्‍यान आणखी एका तरुणाचा मृत्‍यू; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार झाडावर आदळून 2 जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले होते. जखमींपैकी एका तरुणाचा आज, 8 मे रोजी पहाटे मृत्यू झाल्याने या अपघातातील बळींची संख्या 3 झाली आहे. ही घटना 4 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरी अडगाव – आंबेटाकळी रोडवर आंबेटाकळीपासून …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार झाडावर आदळून 2 जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले होते. जखमींपैकी एका तरुणाचा आज, 8 मे रोजी पहाटे मृत्‍यू झाल्याने या अपघातातील बळींची संख्या 3 झाली आहे.  ही घटना 4 मे रोजी रात्री साडेनऊच्‍या सुमारास बोरी अडगाव – आंबेटाकळी रोडवर आंबेटाकळीपासून 1 किलोमीटर अंतरावर (ता.खामगाव) घडली होती.

नितीन जनार्दन सुरवाडे (24, रा. बोरी अडगाव), राहुल बाबुराब सुरवाडे (24, रा. बोरी अडगाव) या दोघांचा मृत्‍यू झाला होता. आज संदीप तानाजी सुरवाडे (28, रा. बोरी अडगाव) याचा मृत्‍यू झाला आहे. रोशन राजकुमार सुरवाडे, मंगेश नारायण सुरवाडे या जखमींवर उपचार सुरू आहेत. नानमुखाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पाच तरुण जेवणासाठी ढाब्‍यावर जात होते. गावापासून 1 किलोमीटरवर जात नाही तोच भरधाव कारवरील क्र. एमएच 28 AZ 94 75) चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळून उलटली होती.