त्‍याची धूमस्‍टाइल तिच्‍या बेतली असती जिवावर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धूमस्टाइल मोटारसायकल चालविणाऱ्यांचे प्रमाण बुलडाणा शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढले असून, त्यांची ही रोमिओगिरी अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरले. कालही 1 मार्चला सायंकाळी एका युवकाने धूमस्टाइल दुचाकी चालवत 17 वर्षीय युवतीला धडक दिली. यात ती जखमी झाली आहे. ही घटना एडेड चौकात घडली. सायली वाकोडे नावाची युवती घरी येत असताना मागून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः धूमस्‍टाइल मोटारसायकल चालविणाऱ्यांचे प्रमाण बुलडाणा शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढले असून, त्‍यांची ही रोमिओगिरी अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरले. कालही 1 मार्चला सायंकाळी एका युवकाने धूमस्‍टाइल दुचाकी चालवत 17 वर्षीय युवतीला धडक दिली. यात ती जखमी झाली आहे. ही घटना एडेड चौकात घडली. सायली वाकोडे नावाची युवती घरी येत असताना मागून धूमस्‍टाइल येणाऱ्या दुचाकीस्‍वार युवकाने तिला धडक दिली. विशेष पोलीस अधिकारी प्रभाकर वाघमारे यांनी तत्‍काळ तिला जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात उपचारासाठी आणले. तिच्‍या कुटुंबियांना फोन करून माहिती दिली. तिला हनुवटीखाली सहा टाचे पडले आहेत.