तळीरामांनो तुम्ही घेताय बनावट दारूचा घोट; मोटाळ्यात बनावट दारूचा कारखाना उद्‍ध्वस्त; 5 लाखांचा मुद्देमाल जप्‍त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुक्यात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार फरारी आहे. घटनास्थळावरून एलसीबीने 5 लाख 23 हजार 548 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल, 18 एप्रिलला रात्री डिडोळा शिवारात करण्यात आली. बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बनावट दारू …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुक्यात बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) बनावट दारूचा कारखाना उद्‍ध्वस्त केला. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्‍याचा साथीदार फरारी आहे. घटनास्थळावरून एलसीबीने 5 लाख 23 हजार 548 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल, 18 एप्रिलला रात्री डिडोळा शिवारात करण्यात आली.

बोराखेडी पोलीस स्टेशनच्‍या हद्दीत बनावट दारू तयार करून त्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार डिडोळा शिवारातील गणेश पाटील यांच्या मालकीच्या एम अँड जी इन्ड्सरीज वॉटर प्युरिफाय प्लॅन्ट प्लॉट नंबर 216  या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. तेथून  बनावट दारू निर्मितीचे रसायन व इतर साहित्य असा 5 लाख 23 हजार 548 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून आरोपी सुभाषसिंग दिवाणसिंग इंगळे (40, रा. तालखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली. त्‍याचा साथीदार अमोल रमेश चोपडे (रा. जळगाव जामोद, ता. बुलडाणा) फरारी आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीला आज, 19 एप्रिलला न्यायालयात हजर केले असता 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने ‘एलसीबी’चे सहायक पोलीस निरिक्षक नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ सुधाकर काळे, नापोकाँ सुनील खरात, गजानन आहेर, पोकाँ विजय वारुळे, विजय सोनोने, श्रीकांत चिंचोले तसेच बोराखेडी पोलीस स्टेशनचे पोहेकाँ राजु आगाशे,नंदकिशोर धांडे, प्रल्हाद वानखेडे यांनी पार पाडली.