“तलाक, तलाक, तलाक… अब मेरा फरहीन के साथ कोई संबंध नहीं…’; खामगावमध्ये ट्रिपल तलाकचे प्रकरण

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील सजनपुरीत ट्रिपल तलाकचे प्रकरण समोर आले असून, २० वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने “तलाक, तलाक, तलाक… अब मेरा फरहीन के साथ कोई संबंध नहीं…’ असे म्हणत तलाक दिला. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरहीनबानो अरशदखान (रा. सजनपुरी खामगाव) या विवाहितेने या …
 
“तलाक, तलाक, तलाक… अब मेरा फरहीन के साथ कोई संबंध नहीं…’; खामगावमध्ये ट्रिपल तलाकचे प्रकरण

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील सजनपुरीत ट्रिपल तलाकचे प्रकरण समोर आले असून, २० वर्षीय विवाहितेला तिच्‍या पतीने “तलाक, तलाक, तलाक… अब मेरा फरहीन के साथ कोई संबंध नहीं…’ असे म्‍हणत तलाक दिला. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

फरहीनबानो अरशदखान (रा. सजनपुरी खामगाव) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. अरशलखान शफिउल्लाखान, शमा खातुन शफीउल्ला खान, अहेमदखान शफीउल्लाखान, कु. फिरदौसखान शफीउल्लाखान (सर्व रा. वायली वेस जळगाव जामोद) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. माहेरवरून मौल्यवान चिजवस्तू व मोठी रक्कम आणली नाही म्हणून फरहीनला पती व सासरच्यांनी विवाहाच्या तीन-चार दिवसांनंतरच एक लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली.

त्‍यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला तिच्‍या आई- वडिलांकडे आणून सोडले. तिच्‍या वडिलांना एक लाख रुपयांची मागणी करत “अशरत कुछ भी कर सकता है! कोर्ट कचेरी मत खेलो तुमको महंगा पडेगा’ अशा शब्दांत धमकी दिली. “अब मैं फरहीन के साथ रिश्ता नहीं रखना चाहता, मै उसको तीन तलाक दे रहा हूँ… तलाक, तलाक, तलाक… अब मेरा फरहीन के साथ कोई संबंध नही रहा’ असे म्‍हणून तिचा पती निघून गेला. त्‍यामुळे विवाहितेने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास पोहेकाँ नन्नेखा तडवी करत आहेत.