तक्रार देण्यासाठी आले…हरवलेले सोने घेऊन गेले… पोलीसदादाचे मानले आभार!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या व्यक्तीला आपले सोने तिथेच परत मिळाल्याची सुखद घटना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आज, 3 मार्चला घडली. बुलडाण्यातील रवींद्र रामचंद्र गवळी यांनी हा अनुभव घेतला. त्याचे झाले असे की, 16 फेब्रुवारी रोजी बुलडाणा पोलीस शहर स्टेशनचे पो. काँ. प्रशांत मोरे यांना शहरातील राजगुरे …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्‍या व्‍यक्‍तीला आपले सोने तिथेच परत मिळाल्याची सुखद घटना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आज, 3 मार्चला घडली. बुलडाण्यातील रवींद्र रामचंद्र गवळी यांनी हा अनुभव घेतला.

त्याचे झाले असे की, 16 फेब्रुवारी रोजी बुलडाणा पोलीस शहर स्टेशनचे पो. काँ. प्रशांत मोरे यांना शहरातील राजगुरे ले आउटमधील पाळणा घराजवळ काही सोन्याचे दागिने सापडले होते. त्यात कानातील 3 बाळ्याचे जोड, गळ्यातील 3 ओम, 8 गोल मणी असे एकूण अंदाजे 40 हजार रुपयांचे दागिने होते. ते त्यांनी पोलीस ठाण्यात जमा केले होते. आज रवींद्र गवळी यांनी पाळणा घराजवळ दागिने हरवल्याची तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांना हरविलेल्या दागिन्यांच्या पावत्या विचारल्यावर ते पावत्या घेऊन आले. ओळख पटवल्यानंतर श्री. मोरे यांना सापडलेले दागिने हे गवळी यांचेच निष्पन्‍न झाल्याने पो.काँ. प्रशांत मोरे, पो.काँ.माधव इंगळे यांच्याहस्ते गवळी यांना दागिने परत करण्यात आले. पोहेकाँ माधव पेटकर हेही यावेळी उपस्‍थित हाेते. गवळी यांनी पोलीस कर्मचारी प्रशांत मोरे यांचे आभार मानले. गवळी यांना त्यांचे दागिने मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच आपल्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे पो.काँ. प्रशांत मोरे यांनी सांगितले. ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्‍या मार्गदर्शनाखाली चांगले काम करण्याला प्रोत्‍साहन मिळत असल्याचेही ते म्‍हणाले.