ट्रॅक्‍टरच्‍या धडकेने पादचारी महिला जागीच ठार; बिबी येथील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रॅक्टरच्या धडकेत पादचारी वृद्ध महिला जागीच ठार झाली. ही घटना काल, 3 मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मेहकर-जालना रोडवर बिबी (ता. लोणार) येथे घडली. गंगूबाई महादेव परदेशी (65, रा. बिबी) असे ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्या मुलासोबत पायी घरी जात होत्या. त्यांना दुसरबीडहून मेहकरकडे भरधाव निघालेल्या ट्रॅक्टरने उडवले. यात …
 
ट्रॅक्‍टरच्‍या धडकेने पादचारी महिला जागीच ठार; बिबी येथील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ट्रॅक्‍टरच्‍या धडकेत पादचारी वृद्ध महिला जागीच ठार झाली. ही घटना काल, 3 मे रोजी रात्री साडेआठच्‍या सुमारास मेहकर-जालना रोडवर बिबी (ता. लोणार) येथे घडली.

गंगूबाई महादेव परदेशी (65, रा. बिबी) असे ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्‍या मुलासोबत पायी घरी जात होत्या. त्‍यांना दुसरबीडहून मेहकरकडे भरधाव निघालेल्या ट्रॅक्‍टरने उडवले. यात गंगूबाईंचा जागीच मृत्‍यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिसांनी घटनास्‍थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. गंगूबाईंचा मुलगा रामू याच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रॅक्‍टरचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.